सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी ) : सुखी, समाधानी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योग महत्वाचा आहे.
योग असे जेथे ; आरोग्य वसे तेथे..
दि.२१ रोजी सोलापूरातील एस. व्ही. सी. एस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला.एस. व्ही. सी. एस हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतांना विद्यार्थ्यांनी पद्मासन,वज्रासन, शलभासन,भुजंगासन, नौकासन,ओंकार जप आणि सूर्यनमस्कार केले.
योगासनाचे महत्व सांगतांना शाळेचे मुख्याध्यापक अतनुरेसर यांनी आज मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगले ठेवण्याची आवश्यकता असून योगासन नियमित करण्याचे आव्हान विद्यार्थांना केले. या योग दिन कार्यक्रमात ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
योग शिक्षिका शितल डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनांची आदर्श स्थिती व फायदे सांगण्यात आले.सूर्य नमस्काराचे महत्त्व विद्यार्थांना पटवून विद्यार्थांमध्ये उर्जा निर्माण करण्यात आली. योग शिक्षिका शितल डांबरे म्हणाले की,योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. योगामुळे तुमचे वय आणि तंदुरुस्ती टिकून राहते. विद्यार्थांसोबत शिक्षकांनी सुद्धा स्वस्त,सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी योगासन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक अतनुरे सर, पर्यवेक्षक बिराजदार, क्रीडा शिक्षक डोंबाळे सर, बिराजदार सर , कुंभारसर , इंगळे सर ,गायकवाड, भुसारे, कस्तुरे होनमाने, कोरे सर, विजापूर रेउरे शरणार्थी जिंदे, डांगे, राजमाने म्हैसलगी व शिक्षक शिक्षकेतर,कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment