सारा न्यूज नेटवर्क -
बीड (प्रतिनिधी) : बीड ता.वडवणी कुप्पा गावातील घटना..!
सदरील घटनाक्रम असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुका या तालुक्यात कुप्पा नावाचं गाव आहे या गावांमध्ये 2021 मध्ये दोन एकर शेती या चांभार समाजातील गणेश मारोती वाघमारे कुटुंबीयांनी विकत घेतलेली आहे त्या शेतीची रजिस्टरी वाघमारे यांच्या नावावर आहे वाघमारे त्या शेतीमध्ये 2023 मध्ये पाळी पेरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना या व्यक्तीच्या बापाने शेती विकली त्याचा मुलगा व चुलत भाव या दोघांनी मिळून चांभारांनो खूप पैसेवाला झाला काय तुमची काय लायकी आहे आमची शेती तुम्ही विकत घेता काय कसं याच्यामध्ये ट्रॅक्टर तुम्ही चालवता हेच मी बघतो म्हणून लाट्या काट्यांनी हनमार केली वाघमारे कुटुंबीयांनी सविस्तर पोलीस स्टेशनला येऊन यांच्या संदर्भात त्यांनी NC दाखल केली.
वाघमारे कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक वडवणी यांच्या कडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
यानंतर पोलिसांनी त्यांना बोलून घेतल्यानंतर आमच्याबद्दल तुम्ही NC का दाखल केली म्हणून गावातील चांभार समाजातील वाघमारे यांचं चौकामधील चप्पल बनवायचे दोन दुकान होते या दोन्ही दुकानाला त्या जातीवाद्याने रात्री अंधाराचा फायदा घेऊन पेट्रोल टाकून दोन्हीही दुखाने जाळून खाक केलेले आहेत काय करतोय तुमचा कायदा काय करते तुमची अॅट्रॉसिटी तेच मी बघतो म्हणून सर्व सामान पेट्रोल टाकून जाळुन खाक केले यांना पोलीस प्रशासनाचा सपोर्ट आहे. याच्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब उघड्यावर व संसार उद्धवस्त झालेला आहे व नुकसान झालेलं आहे,
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment