सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : डी. एस. टी. एस मंडळ संचलित युनिक इंग्लिश स्कुल मध्ये २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेचे अध्यक्ष मा. श्री राजशेखरजी शिवदारे सरांनी या नविन वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या शैक्षणीक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा बाजपेयी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याचे औक्षण करून तसेच गुलाबाची फुले व चॉकलेट देऊन विद्यार्थ्याचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थीत होते.
शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्याचा उत्साह भरभरून दिसत होता. नविन वर्ग, नविन पुस्तके पाहून मुले आनंदीत झाली होती. पहिल्या दिवशीच विद्यार्थी संख्या भरपूर दिसत होती.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment