Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 22, 2023

परिमंडळ कार्यालय (क विभाग) चे अधिकारी राजेश यमपुरे यांचा सत्कार...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ) : महसूल विभागातील कार्यतत्पर मूळचे सोलापूर येथील रहिवासी असलेले सदाबहार व्यक्तिमत्व असलेले सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करणारे राजेश यमपुरे यांची परिमंडळ कार्यालय क विभागाचे परिमंडळ अधिकारी म्हणुन पदभार स्वीकारल्याने जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने नूतन परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे यांचा परिमंडळ कार्यालय क विभाग येथे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.



यावेळी जीके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, संस्थेचे सदस्य पांढुरग सपकाळ, सदस्य अशोक कांबळे कार्यालयीन कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.




सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment