सारा न्यूज नेटवर्क -
श्री श्री श्री १००८ काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे हस्ते सुक्षेत्र हरळया नगर येथे श्री लक्ष्मीदेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
सोलापूर (प्रतिनिधी) : मंगळवार १३/६/२०२३ रोजी सकाळी जलकुंभ यात्रा मारुती मंदिर टिकेकरवाडी येथून कुमठे रोड मार्गे श्री मरिआई मंदिर राहुल नगर व तेथुन श्री लक्ष्मी मंदिर हरळया नगर पर्यंत काढण्यात आली. या जलकुंभ यात्रेत सर्व समाजातील माता,भगिनी,सुहासिनी, महिला सहभागी झाल्या होत्या.
संध्याकाळी सिद्धारुढ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
बुधवार १४/६/२०२३ रोजी सकाळी वैदीक होमहवन रूद्रपुजा, मुर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण इ. कार्यक्रम श्री जगद्गुरू यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उत्सव समिती अध्यक्ष राजू काळे, खजिनदार प्रवीण हरवाळकर, मार्गदर्शक शावरप्पा वाघमारे, लक्ष्मण कट्टीमनी, सुनिल काळे, राजू कांबळे, परशुराम काळे, जीवन चाबुकस्वार, परशुराम बनसोडे, अर्जुन चाबुकस्वार, पिरप्पा कांबळे, श्रीकांत व्हनकडे, विजय शिंदगे, दौलत बसरगी, काशिनाथ चाबुकस्वार, गेनसिद्ध कुंभारीकर, मल्लिकार्जुन मेणसे, अक्षय वाघमारे, लक्ष्मण किणीकर, रोहित टाकळे, दशरथ बनसोडे, प्रकाश घोटाळे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, तांत्रिक कामगार युनियन अध्यक्ष सुनिल काळे, अशोक कांबळे, सागर हुंडारे व इतर सदस्यांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment