Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, June 28, 2023

युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विठ्ठलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापुर मंडळ संचलित युनिक इंग्लिश मिडियम स्कुलमधे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. 



या सोहळ्यामधे विठ्ठलाची पालखी फुलांनी सजवण्यात आली होती पालखीचे पुजन शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडमनी केले. आषाढी एकादशी निमित काही विदयार्थी विठ्ठल रखुमाईच्या वेशभुषेत आले होते. तसेच सर्व विद्यार्थी वारकरी वेशभुषेत आले होते. आठवीच्या विदयार्थ्यांनी सुंदर रितीने लेझीम सादर केले.

या कार्यक्रमाचे कौतुक शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजशेखर शिवदारे सर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुजा बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. वैशाली महाबोले व सौ प्रियंका अग्निहोत्री यांच्यासह इयत्ता नववीचे R. S.P चे विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment