सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी ) :
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत पवार हे होते या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी कलीम शेख यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदूरकर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपने मामा यांच्या आदेशानुसार एकमताने निवड करण्यात आली.
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर शहर अध्यक्ष सरफराज शेख यांच्या हस्ते नूतन शहर उपाध्यक्ष कलीम शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युसूफ मुजावर सुनील परदेशीं महेश मेटकरी मुजलीम काखंडकीकर इम्रान अत्तार शरद भंडारे अजीम खान मोबीन खान बाबुराव सोनवणे सिद्धार्थ भडकुंबे ओवीस खान मुर्त्यूज चौधरी इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment