Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 3, 2023

युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलचे १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलचे १० वीच्या परीक्षेत मोठे यश मिळाले आहे. यावर्षीच्या २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेला १० बोर्ड परीक्षेत युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे.

शाळेचा निकाल हा १००% लागलेला असून १५ विद्यार्थी विशेष योग्यता १५ विदयार्थी प्रथम श्रेणीत तर ०७ विद्यार्थी हे दुसरा श्रेणीत आले आहेत. 

                                 

                                                 प्रसाद मल्लिनाथ गुरव ९३.६0 %

शाळेमध्ये चि. प्रसाद मल्लिनाथ गुरव याला ९३.६० टक्के मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. 


कु. आचल अनंथनाथ चौगुले ९०.४० %


कु. निरंजनी बाळू कोळी ८९.८० %

तसेच कु. आचल अनंथनाथ चौगुले हिला ९०.४० टक्के व कु. निरंजनी बाळू कोळी हिला ८९.८० टक्के मिळवून अनुक्रमे त्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत.


यांना मिळालेल्या या यशाबदल शाळेचे अध्यक्ष श्री राजशेखर वि. शिवदारे सरांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली स. तिवारी, शाळेचे विश्वस्त श्री. भीमाशंकर शेटे सर, श्री. विजयकुमार किलजे, शाळेचे सदस्या डॉ. सौ. शुभदा उपासे यांनी अभिनंदन केले आहे.


यासर्व विदयार्थीना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कि. बाजपेई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी विद्यार्थीचे कौतुक केले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment