Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 28, 2023

सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक रमेश मोहिते यांचा सत्कार

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर ( प्रतिनिधी ): गेली नऊ वर्षा पासून सोलापूर शहर जिल्हामधील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडी आपल्या बातमी च्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्या तसेच वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त साठी आपली लेखणी प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या व पत्रकारिता एक वसा व चळवळ समजून निरपेक्ष निर्भीड पणे काम करणाऱ्या साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र च्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त पोलोस उप अधीक्षक रमेश मोहिते यांचीसाप्ताहिक कार्यसम्राट च्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली असून गेली अनेक वर्षे पोलीस खात्यात सेवा करून आता समाजाच्या न्याय हक्कासाठी एक पत्रकार म्हणून काम करण्याची पोलीस उप अधीक्षक यांनी इच्छा व्यक्त केली असून समाजाच्या भल्यासाठी आपण आता एक प्रामाणिक पत्रकार म्हणून काम करणार असल्याचे सांगितले असून त्यांच आज साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र चे उप संपादक डॉ आशिष कुमार सुना यांच्या हस्ते ओळख शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अकबर मुजावर ( अतनूरकर ) संपादक यशवंत पवार उप संपादक पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी ( बी एस ) साप्ताहिक कार्यसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी स्तोष म्हेत्रे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे जेष्ठ पत्रकार उमाकांत ( बाबा ) काशीद स्तीश गडकरी शुभम् पाटील यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment