सारा न्यूज नेटवर्क -
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी, तर उपाध्यक्षपदी उमाताई देगिनाळ यांची एकमताने निवड
सोलापूर (प्रतिनिधी ), दि. २१ ऑगस्ट:
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मागास समाज सेवा मंडळ कार्यालय, नेहरू नगर येथे पार पडली. या बैठकीमध्ये मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी, उपाध्यक्षपदी उमाताई देगिनाळ तर सचिवपदी सागर पुकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीत ट्रस्टचे प्रमुख शिवशरण आण्णा बिराजदार पाटील यांनी सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली.
मान्यवरांची उपस्थिती व उपक्रम
या वार्षिक सभेस ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी, ट्रस्टी शाम धुरी, डॉ. बसवराज बगले, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, आणि कोळी समाज राज्य पदाधिकारी अंबादास कोळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी संस्थापक सदस्य विजय शाबादी यांनी मंडळाच्या वतीने मागील वर्षात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी कै. राजेश शाबादी यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक मदत म्हणून 'अर्पिता ढवळस' या विद्यार्थिनीला बी.एससी.च्या पुढील शिक्षणासाठी शाबादी परिवारातर्फे ११ हजार रुपयांची देणगी दिल्याचे सांगण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे यांनी केले.
मंडळाची इतर नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
उपाध्यक्ष: गिरीश मंद्रूपकर
कार्याध्यक्ष: लक्ष्मीकांत पुजारी
सहसचिव: गोविंद राठोड, अजिंक्य उप्पीन
कोषाध्यक्ष: प्रसाद गाजरे
सह कोषाध्यक्ष: राचप्पा कटारे
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख: राजेंद्र मुलगे
महिला विभाग प्रमुख: प्रांजली मोहिकर, प्रीती उडानशिव
मिरवणूक प्रमुख: प्रदीप सुरवसे
क्रीडा व मिरवणूक समिती प्रमुख: संतोष कदम, बसवराज नालवार
युवा व आरोग्य कार्यक्रम समिती: रावसाहेब कोळी, राजेंद्र बगाडे
महिला समिती: सुजाता म्हेत्रे, मीना गायकवाड, सुरेखा गोब्बुर, स्वाती पुंजाळ, अलका गाडेकर, ज्योती केगावकर, माशाळे, यादव, मधुमती चाटे
सल्लागार कार्यकारिणी: किरण पुजारी, सिद्धराया होर्तीकर, बिळेणी बिराजदार, उमेश यळसंगी, आण्णाप्पा सतुबर, चंद्रशेखर म्हमाणे, महेश घाडगे, मल्लिनाथ याळगी, शिवशंकर चितली, शिवराज कांबळे

No comments:
Post a Comment