Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, July 1, 2023

श्री समर्थ योगा ग्रुप राम चंडक विहार सैफुल येथे आषाढी एकादशी सोहळा संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : श्रद्धा आणि भक्ती प्रमाणेच मानवतेची शिकवण देणाऱ्या आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जात, धर्म, पंथाच्या सीमा ओलांडून सर्व समाविष्टता जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंड सुरू राहावी. यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न केला पाहिजे. तसाच प्रयत्न श्री समर्थ योगा ग्रुप राम नारायण चंडक विहार सैफुल येथील महिलांनी केला आहे.


श्री समर्थ योगा ग्रुप कडून राम नारायण चंडक विहार सैफुल जुळे सोलापूर याठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने सर्व महिलांनी मिळून आषाढी एकादशी सोहळा एकदम आनंद उत्साहात  साजरा केला.



यावेळी योगशिक्षिका सौ अनुराधा सोपान खारे योग वर्गातल्या योगसाधिका उपस्थित होत्या. रोहिणी भोसले, माधुरी कोरे, सुरेखा तकत, श्रीदेवी बुक्कानवरे, अर्चना माळी, शोभा जोगानी द्राक्ष  कुंभार, रेणुका बोमणे, वनिता थोरात, सुमित्रा अजनाळकर, नलिनी लालसंगे, श्रीदेवी स्वामी, मंगल बिराजदार, सुष्मिता कुंभार, जानवी रंडाळे, शिवगंगा पाटील, जयश्री बोंबणे, अश्विनी तेली, ऐश्वर्या कोरे इतर काही योग वर्गातल्या महिला उपस्थित होत्या.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment