Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 25, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित.. 

प्रतापनगर तांडा येथे आमदार सुभाषबापू देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन.. 


   सोलापूर (प्रतिनिधी) :- देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण विधानसभा मतदासंघातील पश्चिम मंडळातील प्रतापनगर तांडा या ठिकाणी लोकप्रिय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन केले .

   



 कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष भैय्या देशमुख यांच्या शुभहस्ते आरोग्य शिबिराचे उदघाट्न करण्यात आले . प्रतापनगरातील असंख्य महिला,ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला . 




     सोरेगावं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी 

 डॉ कीर्ती राठोड यांचा संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले . 



   या प्रसंगी सरचिटणीस शिवराज सरतापे, मंडळ अध्यक्ष महेश देवकर , विशाल गायकवाड , अमोल गायकवाड , नामदेव पवार महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष निलिमा ताई शितोळे , प्रविण पवार , रवी पवार, प्रसाद पवार , प्रकाश राठोड, अमित राठोड यांच्या सह नागरिक उपस्थित होते. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment