Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, September 5, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क

मा.सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे *माजी केंद्रीय गृहमंत्री  मा. सुशील कुमार शिंदे साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वाढदिवसानिमित्त  प्रशालेतील *विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले व वृक्षारोपण* करून वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार कु. प्रणिती ताई शिंदे यांचे शाळेसाठी अनमोल असे सहकार्य लाभले आहे. संस्था व शाळेच्या विकासासाठी, प्रगतीसाठी  मा.प्रणिती ताई शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून *श्री. गोवर्धन कमटम* ( उद्योजक व बालरंग भूमी सोलापूर शाखेचे पदाधिकारी) *श्री. अंबादास गुत्तीकोंडा* ( उपाध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी ) प्रशालेचे मुख्याध्यापक *डॉ. हणमंत नारायणकर सर* उपस्थित होते. प्रारंभी श्री. गोवर्धन कमटम सर यांनी मा. सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या आदर्श विचार त्यांनी केलेले विकास कामे  याविषयी आपले मत मांडले  व " *झाडे लावा झाडे जगवा* " असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.


 प्रमुख अतिथी, मुख्याध्यापक व प्रशालेतील हरित सेना  यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी  प्रशालेतील सहशिक्षक , श्री.मच्छिंद्र सपताळे सर,श्री.संजय राठोड सर, श्री.सुभाष माने सर  श्री.गणपती कोळी सर,श्री.खंडू शिंदे सर, कु.मानसी निलंगीकर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सुभाष माने सर यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment