सारा न्यूज नेटवर्क -
त्रिमूर्ती गणेश मंडळ, मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा उत्साहात.
उळे गावचे उपसरपंच व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी भाऊ खंडागळे यांच्या हस्ते संपन्न..
(प्रतिनिधी) सोलापूर :- दि.1सप्टेंबर, 2025 रोजी त्रिमूर्ती गणेश मंडळ मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गणपती बप्पांच्या पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने नेताजी(भाऊ)खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते छोट्या मुला-मुलींनी सादर केलेल्या टाळवादन व नृत्यप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
यानंतर श्रींची आरती संपन्न झाली. कार्यक्रमाला त्रिमूर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment