सारा न्यूज नेटवर्क -
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांची जिल्हा सरकारी वकिल श्री. प्रदिपसिंग एम. राजपूत यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भेट
सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, संसदीय कार्य तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकिल श्री. प्रदिपसिंग एम. राजपूत यांच्या निवासस्थानी सांयकाळचे सुमारास भेट दिली.
अँड श्री. राजपूत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर येथून घटस्फोटाचे होणारे परिणाम या अतिशय ज्वलंत आणि क्लीष्ठ विषयावर संशोधन करून, नुकताच आपला प्रबंध सादर केला होता आणि त्यामध्ये विदयावाचस्पती तथा डॉक्टरेट ही पदवी संपादन केली होती तसेच जिल्हा सरकारी वकिल म्हणून काम करताना, आजपर्यंत एकूण १०९ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा तर, 2 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून, महाराष्ट्र शासनाचे नाव लौकिक करण्यामध्ये भर पाडल्याबददल मिठाई घेवून, स्वत कॅबीनेट दर्जाचे मंत्री असताना देखील, त्यांनी सदर कार्याचे तोंड भरून कौतुक करून शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
त्याचबरोबर त्यांनी परिवारातील सदस्यांची आणि सरकारी वकिलांच्या कामकाजाबाबत आपुलकीने विचारपूस करून, चौकशी केली. तसेच सोलापूर विदयापीठात सादर केलेला प्रबंध आवर्जून पाहिला आणि तो आवडल्यामुळे, त्यांनी त्या प्रबंधाची प्रत वाचण्यासाठी सोबत नेली. सदर प्रबंधाबददल मत व्यक्त करताना, मंत्री म्हणाले की, "घटस्फोट" हा विषय आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला भेडसावणारा असून, त्यावर झालेले संशोधन हे निश्चितच समाजासाठी फायदयाचे ठरेल आणि सदर प्रबंधाच्या वाचनानंतर ज्या काही सूचना शासन स्तरावर देणे आवश्यक आहे, त्या सर्व सूचना दिल्या जातील, अशी देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदरवेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. मोहन डांगरे, भा.ज.प.चे सोलापूर शहर अध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर, पतंजली योग समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्षा व भा.ज.पा.चे उपाध्यक्षा श्रीमती सुधाताई अळळी मोरे तसेच सौ. रंजना चाकोते व इतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. सदर सर्वांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव करून, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment