सारा न्यूज नेटवर्क -
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या.
उद्या सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे समाज बांधवांची बैठक...
बैठकीला हजर राहण्याचे मा.सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांचे आवाहन..
सोलापूर(प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील बंजारा समाजास हैदराबादच्या गॅझेटमधील आदिवासी समाजाचा उल्लेख असलेल्या नोंदीप्रमाणे एस.टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी सोलापूर, यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक बंजारा तांड्यात जाऊन जनजागृती करून मोठे आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी समाजातील सर्व संघटना, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, संस्था चालक अशा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी आपल्या न्याय, हक्कासाठी, समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, राजकीय भागीदारीसाठी आपल्या मनातील मतभेद बाजूला ठेवून आपल्या समाजास न्याय मिळवून देण्यासाठी, पुढील पिढीचा उद्धार करण्यासाठी, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या चळवळी मध्ये भाग घ्यावे. बंजारा समाजास वेळेत एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश नाही केल्यास मोठे स्वरूपाचे आंदोलन उभा करू, करिता आपण सर्वांनी उद्याच्या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment