सारा न्यूज नेटवर्क -
भारतीय जनता पार्टी यांनी घेतली प्रकाश राठोड यांची दखल शहर सचिव पदी केली निवड...
सोलापूर (प्रतिनिधी) :- मागील अनेक दिवसांपासून सोलापूर परिसरात कार्यकुशल कर्तुत्वातून छाप पाडणारे माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मा.प्रकाशभाऊ राठोड हे शहर परिसरात विविध उपक्रम हाती घेऊन जनमानसात आपली प्रतिमा तयार केली आहे. श्री.प्रकाश राठोड यांच्या वतीने शहरातील काही भागात विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याकरिता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेऊन कौतुकाची थाप दिली. सर्व विद्यार्थ्यांना सन्मान पत्र व ट्रॉफी देण्यात आली. तसेच अनेक शाळांमध्ये ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर महा-ई शिबिर सेवाच्या माध्यमातून नागरिकांनी सरकारी योजनेचा लाभ घ्यावा करिता, वयोवृद्ध नागरीक, महिला बालक, अंध अपंग नागरिक असे लोकं जे सरकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकत नाही. अशा सर्व नागरिकांसाठी दारापर्यंत जाऊन तब्बल २० ठिकाणी कॅम्प लावून आधार कार्ड, पॅन कार्ड, इ श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, संजय गांधी निराधार योजना यासारख्या तत्सम शासकीय योजना नागरिकांना देण्याकरिता *महा ई शिबिर सेवा* माध्यमातून सर्व मोफत कागदपत्रे काढून देण्याची सेवा केली त्यांनी केली.
कुबेर चेंबर, इचगिरी मठ, विजापूर रोड सोलापूर येथे प्रकाश राठोड यांचे सेवा फाउंडेशन कार्यालय असून दररोज २० ते २५ नागरिक विविध अडीअडचणी समस्या घेऊन येतात सदर अडचणीत तात्काळ निराकरण केले जाते . ई- सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा देणे तसेच महानगरपालिका स्तरावर असलेले सर्व कामे या कार्यालयाच्या माध्यमातून केली जातात.
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून लोकांच्या समस्या सोडविणे आपल्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेणे, पालिका प्रशासनाकडून ते काम करवून घेणे. खराब रस्ते, लाईट, पाणी, गटार, शौचालय या संदर्भात नागरिकांच्या असलेल्या समस्या तात्काळ निराकरण करून देण्याचे काम केले. महानगरपालिकेच्या २१ वर्षाचा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्याचे निराकरण करण्यात आले. महिलांना सामाजिक जीवनात वावरण्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन विविध लोकोपयोगी आणि मनोरंजनाचे उपक्रम घेऊन त्यांना आनंदी करण्यात आले. महिला बाल सक्षमीकरण मुद्दा लक्षात घेऊन यावर्षी *"माझा गणपती स्पर्धा"* आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये शहरातील जवळपास ४५० घरगुती गणपतीच्या लोकांनी सहभाग नोंदविला होता , सहभागी झालेल्यांपैकी लॉटरी पद्धतीने २५ जणांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. आणि २० सार्वजनिक मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त सुंदर देखावे सादर करणाऱ्या चार मंडळाची निवड करून ट्रॉफी,सन्मान चिन्ह व काही रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी महिलांना रोजगार निर्मिती तसेच घरगुती व्यवसाय लघुउद्योग या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यासह शहरात अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.
प्रकाश राठोड सारख्या जनसेवकाचे भारतीय जनता पार्टीने दखल घेऊन *शहर सचिव पदी* निवड केल्याबद्दल जुळे सोलापूर भागातील अनेकांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या आनंदाचा श्रेय आमदार सुभाष बापू देशमुख आणि भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांना जातो असे प्रकाश राठोड यांनी सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment