सारा न्यूज नेटवर्क -
छ.धर्मवीर संभाजी गणेशोत्सव तरूण मंडळ आयोजित रक्तदान शिबारास उत्स्फुर्त प्रतिसाद ;
६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
मंद्रुप (प्रतिनिधी) :- छ.धर्मवीर संभाजी महाराज गणेशोत्सव तरूण मंडळ मंद्रुप व संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन मंद्रुप आयोजित रक्तदान शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद पहायला मिळाला.
श्री.मनोज पवार साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक,मंद्रुप पोलिस ठाणे) तसेच श्री.सागर जी चव्हाण साहेब(गोपनिय विभाग,मंद्रुप पोलिस ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत "श्री" ची पुजा करण्यात आली.त्यानंतर रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे,वैद्यकीय अधिकारी मिताली रेड्डी,मंडळाचे अध्यक्ष अभिषेक कोरे,प्रसाद शेंडगे,विनोद कामतकर,रक्तपेढीचे डॉ शैलेश पटणे,पर्यवेक्षक अश्विनी मनसावले,संचालक नागार्जुन जिंकले,संचालक वैभव राऊत,पर्यवेक्षक रोहित बगले,यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रवी वाडकर,विरेश उंबरजे,मल्लिनाथ(अप्पु) हिरेमठ ,उत्कर्ष भागवत,विजय नवले,राजेश नवले,शाम गोसावी,sd माळी,अनिकेत केवटे,समर्थ नवले,अक्षय वाडकर,धनराज कासार,खय्युम मोमिन यांनी परिश्रम घेतले.
६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment