सारा न्यूज नेटवर्क -
आपली संस्कृती,परंपरा आपल्या हातात...!
'ब्रतुकम्मा' खेळूया, आकर्षक साड्या जिंकूयात'.!
● ब्रतुकम्मा सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी 3 आकर्षक साड्या..
● महिलांसाठी सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषेसाठी 3 आकर्षक साड्या..
"श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन* व
" पद्मशाली सखी संघम'" आयोजित
सोलापूर(प्रतिनिधी) :- सोलापूरातील तेलुगु भाषिक महिला नवरात्री उत्सवामध्ये अष्टमीला 'ब्रतुकम्मा' साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. विविध फुले एकत्र करुन मनोरा सारखे सजवून मध्यभागी हळदीच्या सहाय्याने श्री गौरीदेवी (श्री गौरम्मा) बनवून तिचे मनोभावे विधीवत पूजा करुन 'ब्रतुकम्मा' भोवती फेर धरत लोकगीते म्हटले जाते. सोलापूरात मात्र अष्टमीलाच ही विविध फुलांचा 'ब्रतुकम्मा' तयार करण्याची परंपरा आहे. तेलंगणा राज्यात आजही नऊ दिवस मुली, युवती आणि महिला एकत्र येऊन 'ब्रतुकम्मा' भोवती फेर धरतात. नऊ दिवसांसाठी नऊ नांवे आहेत. सोलापूरातील तेलुगु भाषिक महिलांसाठी नवरात्रोत्सवात अष्टमीला म्हणजेच मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.०० ते ८.०० यावेळेत या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश सरगम व सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, उपाध्यक्षा लक्ष्मी यनगंदूल, सचिवा रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिले आहे.
ब्रतुकम्मा ही स्पर्धा पोलीस मुख्यालय जवळील, व्हिवको प्रोसेस समोर असलेल्या 'श्री मार्कंडेय उद्यानात' (बाग) होईल. सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने तेलुगु भाषिक महिलांसाठी आपली संस्कृती, परंपरा आपल्या हातात.! या अनुषंगाने ब्रतुकम्मा भोवती फेर धरत सर्वोत्कृष्ट पारंपरिक नृत्य करणा-या एकूण ५ महिलांना आकर्षक साड्या बक्षीस स्वरुपात दिले जाईल. 'सर्वोत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावटी'साठी एकूण ३ आकर्षक साड्या पारितोषिके म्हणून दिले जाईल. तसेच 'पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा' करणा-या एकूण ३ महिलांना आकर्षक साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सोलापूरातील नामवंत असलेल्या चाटला पैठणी सेंटर तर्फे देण्यात येणार आहे. ● जगातील लोकसंख्यानुसार झाडे कमी प्रमाणात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. रोपे कसे लावावेत? त्यांची संगोपन कसे करायचे? आधीबाबतीत पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख डॉ. महेंद्र घागरे हे मार्गदर्शन करणार आहेत.● तसेच तेलुगु भाषिक महिलांना त्यांच्या 'कर्तृत्वाला उभारी' देण्यासाठी लवकरच 'तेलुगुवारी रुचुलू' (तेलुगुजणांचे स्वाद) फूड फेस्टिवल आयोजन करण्यात येणार आहे. फक्त तेलुगु भाषिक महिलांसाठीच असणार असून, इच्छुकांनी (9021551431- गौरीशंकर कोंडा) यांच्याशी संपर्क साधावेत. ब्रतुकम्मा उत्सवात जास्तीत जास्त तेलुगु भाषिक महिलांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन फाउंडेशन व सखी संघमच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment