सारा न्यूज नेटवर्क -
मागास समाज सेवा मंडळ संचालित श्री वसंतराव नाईक हायस्कूलचे कुस्ती स्पर्धेत मुलींचे यश.
सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2025- 26 यावर्षीच्या कुस्ती स्पर्धा श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, सोलापूर ,दि. 16 /9 /2025 रोजी या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत 14 व 17 वयोगटांमध्ये अनुक्रमे
१)कु. आरुषी संजय कल्लावाले- प्रथम ,39 किलो वजनी गट
२)कु.आरवी देविदास कजाकवाले- प्रथम ५०किलो वजनी गट
१)कु.कोमल विठ्ठल चौधरी -प्रथम, 40 किलो वजनीगट
२)कु. आकाशी मुकेश कैय्यावाले -द्वितीय , 40 किलो वजनीगटात यश संपादन केले आहे .
यशस्वी विद्यार्थिनींना श्री नामदेव देशमाने क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले , मुख्याध्यापक श्री कार्तिक चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले .संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष काका चंद्राम चव्हाण ,उपाध्यक्ष, संचालक मंडळ ,पर्यवेक्षक महासिद्ध म्हमाणे,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचा अभिनंदन करून, विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या!!
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment