Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 1, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

प्रेशीता हिच्या हाताच्या रशियन इलिझारोव्ह शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन.


सोलापूर(प्रतिनिधी) : - प्रेशीता इसाक कुमार या सहा वर्षाच्या मुलीच्या उजव्या दंडाच्या हाडास कीड लागून हाड मोडलेले आहे व त्यावर फक्त जगप्रसिद्ध रशियन इलिझारोव्ह या पद्धतीनेच उपचार होऊ शकतात. त्यासाठी तिला सोलापुरातील आडके हॉस्पिटल या ठिकाणी भरती केलेले आहे. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीचे व खर्चिक आहे. ही शस्त्रक्रिया अस्थिरोग व इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके हे करणार असून त्यास अडीच लाख रुपये इतका खर्च होणार आहे. उरलेला खर्च आडके फाउंडेशन व आडके हॉस्पिटल तर्फे करण्यात येणार आहे. रुग्णाची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे व मागील सहा महिन्यात इतर हॉस्पिटलमध्ये यावर इलाज करण्यामध्ये बराच पैसा खर्च झाल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन रुग्णाचे वडील इसाक कुमार यांनी केले आहे.  आर्थिक मदतीसाठी इसाक कुमार मोबाईल ९१५६८६५६४८ अथवा आडके हॉस्पिटल, अस्थिरोग विभाग, उत्तर सदर बजार ,सोलापूर ०२१७-२३१९५१४ येथे त्वरित संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment