सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहिर करा, तसेच शेतक-यांना पिकांचे नुकसानीचे सरसकट आर्थिक मदत करा -
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य यांची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हयात सर्वे तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण आतिशय जास्त असून जिल्हयातील सर्व छोटे मोठे तलाव पूर्ण भरलेले आहेत. परीसरातील सर्व नदी नाल्यास आलेल्या पुरामुळे व तसेच सततच्या पावसामुळे जिल्हयातील सर्व तालुक्यातील जवळपास १००% शेतकऱ्यांच्या पिकाची उहीत, मूग, तूर, सोयाबीन कांदा तसेच सर्व फळबागा यांची नुकसान झालेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतलेला आहे. तसेच काही ठिकाणी घरे पडणे, पाळीव प्राणी आजारी पडणे, काही ठिकाणी जिल्हयात जिवीतहानी देखील या पावसामुळे झालेली आहे. या वर्षी ड्रतिकृत्याची होणाऱ्या उत्पन्नातही जवळपास ९० ते १०० % इतके घट झालेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
तरी विनंतीपूर्वक निवेदन देतो की, जिल्हयातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत देण्यात यावी व पिकांचा पीक विमा जिल्हयातील शेतकऱ्यांनी भरलेला आहे. तो तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्यचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) मारुती त्रिंबक श्रीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment