सारा न्यूज नेटवर्क -
कृषिमंत्री दत्तामामा यांचा पूरग्रस्त अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना दिलासा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा.दत्तामामा भरणे साहेब यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून पाहणी केली.
पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या, हालअपेष्टा व त्यांचे दुःख-दैन्य त्यांनी जवळून अनुभवले. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना मा.मामा साहेब म्हणाले
“सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. खचून जाऊ नका. मी कृषी मंत्री असलो तरी स्वतः एक शेतकरी आहे. तुमच्या भावना मला उमगतात. सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
त्यांचे हे शब्द ऐकून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत दिलाशाचे अश्रू आले. मा. दत्तामामा भरणे यांनी फक्त पाहणी न करता, प्रत्यक्ष पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जाऊन फूड पॅकेट वाटप करून मदतीचा हात पुढे केला. माणुसकीला प्राधान्य देत त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांना आश्वस्त केले.
माढा तालुका – उंदरगाव भेट
माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. उमेश पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे, विक्रम शिंदे, मिनलताई साठे, दादासाहेब साठे, पृथ्वीराज सांवत आदींच्या उपस्थितीत झाली.
मोहोळ तालुका – पासलेवाडी, नांदगाव व लंबोटी येथे भेट
मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी व नांदगाव येथे पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. उमेश पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे साहेब, नांदगावचे सरपंच श्री. सचिन सुरवसे, तसेच MIT पुणे येथील विद्यार्थी प्रमुख शुभम तापडिया यांनी १० लाख रुपयांची मदत घेऊन हजेरी लावली.
यावेळी जिल्हा प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवेदनशील व कार्यक्षम उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे पुढील काळात मदतकार्याला गती मिळणार आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे





No comments:
Post a Comment