Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, September 20, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 गावगुंडांच्या हल्ल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे 03 पत्रकार जखमी; पत्रकार कृती समितीच्या वतीने तीव्र निषेध.. 

केली कठोर कारवाईची मागणी 

सोलापूर(प्रतिनिधी) : - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तासंकलनास गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना स्वामी समर्थ केंद्रजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील बेदम मारहाण झालीय. पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांना मारहाण झालेल्या पत्रकारांची नांव असून किरण ताजणे यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेचा पत्रकार कृति समिती, सोलापूरने निषेध नोंदविला आहे.

भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जात असलेल्या पत्रकारांवर गावगुंडांकडून हल्ला ही निंदनीय घटना आहे. राज्य सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी पत्रकार सुरक्षा कायदा आणला, मात्र तो कायदा कागदावरच आहे काय ? असा सवाल आम्हाला सतावतोय. त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेचा आम्ही पत्रकार कृती समितीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवतोय.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावगुंडांकडून कधी अधिकाऱ्यावर तर कधी पत्रकारांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या अपप्रवृत्तीला कायद्याने ठेचून काढण्यासाठी केलेल्या कायद्याचा वा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण म्हणून पत्रकार सुरक्षा कायदा केवळ कागदावर न ठेवता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून समाजात वाढीस लागलेल्या दुष्प्रवृत्तीवर पायबंद घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी पत्रकार कृती समितीची एकमेव मागणी आहे.

आपण भी पुन्हा येईन' म्हणत आलात, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री झालात. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्र्यंबकेश्वर येथे विविध वाहिन्यांच्या तीन पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा पत्रकार कृती समितीचा आग्रह आहे, अन्यथा कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ? असा सवाल 'दर्पण कारांचा वारसा सांगणारी मराठी पत्रकारिता पदो-पदी आपणास विचारणार आहे, असा इशारा पत्रकार कृति समितीनं दिला आहे.

या पत्रकारांवरील हल्ल्यातील गांव गुंडावर आपण कठोर कारवाई करावी, ही मागणी कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रसंगी निदर्शने आंदोलने करणार आहोत, याची शासनाने नोंद घ्यावी, असं पत्रकार कृति समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटल आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment