सारा न्यूज नेटवर्क -
“निष्ठेचा विजय… शिवसेनेचा अभिमान.!”
ज्ञानदेव कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामशेत शहर प्रमुख पदी निवड..
( शब्दांकन दिपक खोपकर )
कामशेत :- निष्ठावंत शिवसैनिक मा. श्री. ज्ञानदेव जी कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामशेत शहर प्रमुख पदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीची निवड नाही, तर शिवसेनेच्या भूमीत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या भावनेचा विजय आहे.
आजच्या राजकारणात पदं विकत घेतली जातात…
पण तुमचं पद हे निष्ठेचं फलित आहे.
तुमचं नेतृत्व हे सामान्य माणसाच्या विश्वासाचं शस्त्र आहे.
आणि तुमची ही निवड ही समाजासाठी लढण्याची शपथ आहे.
🚩 बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेला मंत्र – २०% राजकारण आणि ८०% समाजकारण –
हा फक्त वाक्य नसून तोच तुमच्या वाटचालीचा मार्ग ठरणार, याची खात्री आहे.
आज समाजबांधवांत उमेद आहे की,
👉 कामशेत शहराला खरी ताकद मिळाली आहे,
👉 शिवसेनेला खरं नेतृत्व लाभलं आहे,
👉 आणि सामान्य माणसाला ठोस आवाज मिळाला आहे.
ही निवड म्हणजे सुरुवात आहे ठाकरी गर्जनेच्या नव्या पर्वाची!
🌹 अशीच तुमची प्रगती होत राहो…
🌹 समाजहितासाठी झगडण्याची ताकद वृद्धिंगत होवो…
🌹 आणि ठाकरी शैलीत खऱ्या शिवसैनिकाचं कार्य घडत राहो…
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment