सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारितेतील योगदानाची दखल ;
अक्षय बबलाद यांचा वाढदिवसानिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी)- दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद यांच्या ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर यांच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अक्षय बबलाद यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.
श्रमिक पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आणि कृष्णा चव्हाण यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी अक्षय बबलाद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना किरण बनसोडे यांनी अक्षय बबलाद यांच्या आजवरच्या पत्रकारितेतील योगदानाचा तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याचा उल्लेख केला. पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील विविध प्रश्न मांडून त्यावर प्रकाश टाकण्याची आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून अक्षय बबलाद यांनी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. भविष्यातही त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडावी आणि पत्रकारितेतील आपली वाटचाल अधिक व्यापक करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कारामुळे अक्षय बबलाद यांना पत्रकार बांधवांकडून मिळालेल्या स्नेहाचे आणि आपुलकीचे दर्शन घडले. पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत कार्याची दखल घेतात, ही पत्रकार संघटनांच्या एकजुटीची आणि परस्पर स्नेहाची सकारात्मक बाजू असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी नंदकुमार येचे, अजित उंब्रजकर, महेश हणमे, संतोष कासे यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी अक्षय बबलाद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.


No comments:
Post a Comment