सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : महावितरण सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता माननीय श्री संतोष सांगळे साहेब यांची मंत्रालय, मुंबई येथे समन्वयक पदी पदस्थापना झाल्यामुळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या वतीने साहेबांचे अभिनंदन व सत्कार करून साहेबांना पुढील वाटचालीस, कार्यकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे सोलापूर मंडळ (सर्कल ) अध्यक्ष श्री सुनील काळे, सचिव सतीश पाटील, तानाजी चटके, शुकुर शेख, विजयकुमार भावी, संजयकुमार स्वामी, दीपक ताटे, बळीराम कदम, शब्बीरअली पटेल, एम. एम. करजगीकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे, कुटुंब भावनेमुळे आपण आपल्या सोलापूरचे नाव प्रत्येक विभागात, प्रत्येक क्षेत्रात उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामध्ये खास करून आपण कृषी धोरण अंतर्गत शेतीपंपाची वसूली, या वर्षात १८००० शेती पंप कनेक्शन, घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक थकबाकी वसुली यात पुणे रिजन मध्ये चांगली कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आषाढी एकादशी निमित्त आपण सर्वांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे विनासायास, विनाअपघात आषाढी एकादशी पार पडली. ही खरंतर त्या पांडुरंगाची कृपाच म्हणायची. आपल्याला सोडून जाताना निश्चितच अंत:करण जड होत आहे. परंतु आपले संबंध हे आयुष्यभरासाठी जोडले गेलेले आहेत. आणि शेवटपर्यंत हे संबंध असेच राहतील. मी जिथे कुठे जाईन तिथून सोलापूरकडे नक्कीच लक्ष देईल. आपला हा सहवास माझ्यासाठी खूप आनंददायी आणि प्रेरणादायी होता. आपल्या सक्षम टीम मुळे सोलापूर जिल्ह्याचे भवितव्य निश्चितच उज्वल आहे, याची मला खात्री आहे. आपले ऋणानुबंध असेच अतूट राहतील अशी आशा बाळगतो. पुनश्च: एकदा आपल्या सर्वांचे मनस्वी आभार. असे मनोगत व्यक्त केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment