Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 4, 2023

सोलापूरचा पर्यटन व विकासाच्या संदर्भात इकोनेचर क्लबचे निवेदन...



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी)  माननीय मंत्री महोदय श्री मंगल प्रभात लोढा यांच्या समवेत सोलापूर पर्यटन विकास या संदर्भात चर्चा करण्यात आली तसे:च त्यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना माननीय मा मंत्री विद्यमान आमदार सुभाषजी देशमुख सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर मंडल अध्यक्ष महेश देवकर इको  क्लबचे मनोज देवकर  उपस्थितीत निवेदन देण्यात आले. 


सोलापुरातील नद्यांच्या स्वच्छता व पर्यटन विकास व्हावा या संदर्भात निवेदन देण्यात आले दक्षिण सोलापुरातील हा तर कुडल संगम हा त्रिवेणी नद्यांचा संगम असलेली तीर्थक्षेत्र तिथला पर्यटन विकास व्हावा तसेच सोलापुरातील होटगी तलाव तेथे परिसरात बॉटनिकल गार्डन तसेच मोठ्या प्रमाणात उद्यान व्हावं व पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावा जसे कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण या परिसरात भव्य आकर्षित उद्यान निर्माण केले गेलेले आहे त्याप्रमाणे आपल्या सोलापुरातील सर्वात मोठे उद्यान मोठे उजनी धरण हे सर्वांना सुपरिचित आहे तेथील आजूबाजूच्या परिसरात ही पर्यटन मोठ्या प्रमाणे विकसित व्हावा व मोठे उद्यान व्हावे जेणेकरून पर्यटक त्या पटीने येत राहतील व सोलापूरला रोजगार निर्मिती सुद्धा होईल सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्र व पर्यटन यासाठी अनेक भाविक वर्ग येत असतात सोलापूर जिल्ह्यातील भौगोलिक विकास पर्यटन दृष्टी व्हावे या विषयासंदर्भात इको नेचर क्लब ने पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांना सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले आहे याचा लवकरच अभ्यास करून सोलापूर पर्यटन विकास कसा विकसित होईल याचा प्रयत्न राहील.



सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 


No comments:

Post a Comment