Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, July 2, 2023

अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री ; मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…



 सारा न्यूज नेटवर्क - 

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री. 

राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे.



महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ, राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी.

@आज दुपारी 2:30  वाजता शपथविधी झाला .

1)अजित पवार, 

2)छगन भुजबळ, 3)दिलीप वळसे पाटील,

4)हसन मुश्रीफ, 

5)धनंजय मुंडे,

6)धर्मराव बाबा आत्राम,

7)आदिती तटकरे,

8)संजय बनसोडे,

9)अनिल पाटील

यांनी  मंत्री म्हणून शपथ घेतली.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment