सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दिनांक 13 रोजी बोलवण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी श्री बिपिन करजोळे होते..
प्रस्तावना संगमेश बगले युवक अध्यक्ष यांनी केले, अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले , अध्यक्षीय भाषणात करजोळे यांनी सन्माननीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी आपण एकजुटीने खंबीर उभे राहू या व पुन्हा पक्षाला उभारी देऊन पवार साहेबांचे हात बळकट करूया व येणाऱ्या काळात पवार साहेबांचे विचार तालुक्यात घरोघरी पोहोचवून पक्ष भक्कम पणाने उभा करून पुन्हा महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आणू असे विचार त्यांनी व्यक्त केले व पवार साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी बिपिन करजोळे यानी या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडला व सर्वानुमते मंजूर झाला..
या मिटींगला प्रामुख्याने खालील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
बीपीन अशोक करजोळे तालुकाध्यक्ष, संगमेश बगले युवक तालुकाध्यक्ष, निंगोंडा तळे ज्येष्ठ नागरिक तालुकाध्यक्ष, मिलिंद गोरे जिल्हाध्यक्ष मीडिया सेल, महेश माने जिल्हा उपाध्यक्ष, प्रा.सुभाषचंद्र बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष, शिवानंद हिरेमठ, बळीराम हेबळे, जीवन पवार, आमसिद्ध कांबळे, अर्जुन वाघमारे, अनमोल केवटे, उत्कर्ष भागवत, इमरान मुजावर, उमरदराज काजी, शंभुराजे भरले, रेवणसिद्ध कोळी, परमेश्वर सावंत, राहुल बनसोडे, माशप्पा कोळी, विश्वनाथ कुमठेकर, मशाक मुजावर, दत्तात्रय पवार, बालाजी जाधव, भीमराव काकडे, यल्लाप्पा बनसोडे, घनश्याम किरगत, रणजीत चौगुले, माऊली सुतार, सोमनिंग शेंडगे, भीमराव काकडे, रेवप्पा शिंदे, गोकुळ भालेराव, सचिन काळे, श्याम वरुडे आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री माशप्पा वजीर कोळी राहणार मंद्रूप यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या..
आभार जाहिरोद्दीन नदाफ यांनी मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment