सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : मारूती गोपाळ साळुंके यांचा आज 75 वा वाढदिवस आनंद व उत्साहात सपत्नीक साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा तुला करण्यात आला, त्याप्रसंगी त्यांच्या वजना येवढे धान्य तुला करून अनाथ आश्रमास देण्यात येऊन एक सामाजिक संदेश त्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेला आहे. या बद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वाढदिवसाचे नियोजन अक्कलकोट MIDC रोड येथील अंबिका फंक्शन हॉल मध्ये करण्यात आले होते, सर्व प्रथम त्यांचे सपत्नीक औक्षण करण्यात आले, त्या वेळी साळुंके कुटुंबातील सर्व महिला सदस्य उपस्थित होते. त्यांनी त्यांचे सपत्नीक औक्षण करून त्यांचे शुभआशिर्वाद घेतले. त्या नंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मारुती साळुंके यांच्या सोबत काम केलेले त्यांचे सहकारी मित्र तब्बल पंचवीस वर्षानी एकत्र येण्याचा योग आला होता, त्यामध्ये अशोक बिराजदार, कुमार वस्त्रद, संतोष स्वामी, भाग्येश उपाध्य, विजय स्वामी, राहुल माळी, बसवराज हुल्ले, अशोक हुल्ले आदी सर्वानी उपस्थित राहुन साळुंके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमा निमित्त उपाध्ये साहेब, नागेश माळी, चन्नपा हुल्ले, हनुमंत बिडवे, मल्लु घसाडे, तुकाराम जाधव, राम साळुंके, PSI तुळशीदास साळुंके , प्रकाश साळुंके , अनिल पाचंगे, प्रकाश पाचंगे यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
.
या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे सहकुटुंब उपस्थित होते, सोबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा यांचीही उपस्थिती होती. त्यांनी साळुंके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार केला.
मारूती साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार, त्यांचे ईतर नातेवाईक व त्यांच्या सोबत नौकरी केलेले त्यांचे सोबती यांनी त्यांचा फेटा शाल व पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मारूती साळुंके यांचे सुपुत्र अशोक साळुंके यांचे मित्र अनिल प्याटी, शाम ढवळे, महादेव कोरे, महेश जोशी, शंकर कल्पवृक्ष, राम मोतीवाले, चिदानंद हिरेमठ, बापू भोसले, कांचन कांबळे, आनंद कोटी, दयानंद चकरे, राम हुंडारे, संतोष खरात आदी मित्र परिवार सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खरात यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment