Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 5, 2023

सोलापूरातील अक्कलकोट रोड MIDC मध्ये मोठी दुर्घटना : तीन जनांचा मुत्यु ..!

 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : शहरातील अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी तील रूपम इंडस्ट्रीजला आज पहाटे मोठी आग लागली. या आगीत तब्बल तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


                                                               (संग्रहीत छायाचित्र) 

अक्कलकोट रोड एम.आय.डी.सीतील रुपम इंडस्ट्रीजला बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता मोठी आग लागली. कमी असलेले आगीचे प्रमाण अचानक वाढवून यात तीन बिहारी मजुरांचा मृत्यू झाला आहे. या कारखान्यात एलपीजी गॅस, इलेक्ट्रिक शेगडी अशा वस्तूंमुळे ही आग भडकल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले.

आगीची माहिती कळताच सोलापूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

सोलापूरमहानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने रुपम इंडस्ट्रीजमधील तीन मृतदेह बाहेर काढण्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी आज विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

आग लवकरच आटोक्यात येईल, कसे अग्निशमन दला कडून सांगण्यात आले. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment