Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 17, 2023

राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर, पत्रकार सुरक्षा समिती कोअर कमिटी ची स्थापना करणार...



सारा न्यूज नेटवर्क

सोलापूर ( प्रतिनिधी ) : पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले  जात आहेत  त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे काही विषय प्रलंबित असून 

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*

*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*

*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*

*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*

*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*

*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*

*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*

*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*

*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*

*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*

*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*

या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा  लवकरच कोअर कमिटी ची स्थापन करणार असून ज्यात अनेक दैनिकांचे विविध चॅनल  व साप्ताहिक मधील संपादक तसेच तज्ज्ञ पत्रकारांचा समावेश असेल

 *राज्यातील पत्रकारांचे प्रश्न  सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती लवकरच कोअर कमिटी ची स्थापना करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे*

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment