सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : जुळे सोलापूर मधील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थीबरोबरच परिसरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे भाभा अणुसंशोधन केंद्र, अणुउर्जा संशोधन सहयोग संकुल, येथे अभियंता पदावर कार्यरत असणारे श्री. जयंत जोशी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथम त्यांनी विज्ञान म्हणजे काय? हे अगदी सहज सोप्या शब्दात समजावून सांगितले. बिनभिंतीच्या शाळेत शिकणारा अभ्यास म्हणजे विज्ञान. शिकण्यापेक्षा कृती करणे म्हणजे विज्ञान हे विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक प्रयोगातुन समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना गुरूत्वाकर्षण कॅलेडेस्कोप दुर्बीण, पेरिस्कोप, Law of Reflection हे आणि या सारखे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनसमवेत स्वतः कृती करून दाखविली. शाळेल विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदी वातावरणात वैज्ञानिक प्रयोगांचा आनंद लुटला विद्यार्थ्याच्या चेह-यावर आनंदाबरोबरच कुतुहल, जिज्ञासा उत्सुकता दिसून येत होती. या कार्यशाळेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजशेखर वि. शिवदारे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त प्रा.बी.व्हि. शेटे यांच्या अथक प्रयत्नातून कार्यशाळा संपन्न झाली. तसेच युनिक इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडम व मुख्याध्यापिका सौ. पुजा बाजपेयी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. ह्या कार्यशाळेस समन्वय म्हणून सौ. अश्विनी बिराजदार यांनी काम पाहिले तसेच दोन्ही सत्रात मिळून सुमारे २०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मिनाक्षी माढेकर यांनी केले. ह्या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हि.जी. शिवदारे कॉलेज, व्हि.जी. शिवदारे जुनियर कॉलेज, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली) व युनिक इंग्लिश मिडीयमच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे विशेष सहाकार्य लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment