सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : महा NGO फेडरेशन, इको नेचर क्लब व इतर सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आव्हानाला वृक्षारोपणाचा प्रतिसाद देत महा एनजीओ फेडरेशन अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर भाऊ मुंदडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.
सोलापूर मध्ये डॉ मनोज देवकर यांच्या नियोजनाने इको नेचर क्लब माध्यमातून सोलापुरातील विजापूर नाका पोलीस चौकी तसेच एस आर पी कॅम्प पोलीस बलगट क्रमांक 10 तसेच सोलापूर महानगरपालिका शाळा या जुळे सोलापूर परिसर लष्कर सदर बाजार पोलीस चौकी परिसर सैफुल परिसर माशाळ नगर अशा विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. 53 वा वाढदिवस दिनानिमित्त 53 पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच सोलापूर तेली तर दोन संस्था यानेही 53 53 वृक्ष लावून या कार्यामध्ये सहभाग घेऊन वृक्षांचे योगदान दिले 🙏🌳
सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मोरे सर तसेच विजापूर नाका पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचौवरे सर पोलीस निरीक्षक श्री शिंदे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव पोलीस उपनिरीक्षक गायकवाड सर तसेच पोलीस बल गट क्रमांक डी वाय एस पी श्री हराळ सर पोलीस निरीक्षक श्री मस्के सर पोलीस उपनिरीक्षक श्री टिंगरे सर व पोलीस जवान श्रीराम जन्मोत्सव समितीचे संजय दादा साळुंखे सोलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष व मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक दत्तामामामुळे एबीपी माझा चे महाराष्ट्राचे हेड राजकुमार शास्त्री तसेच सोलापूर महानगर पालिकेतील शिक्षक श्री सुतार सर नारायणकर सर विद्यार्थी इको नेचर क्लबचे सर्व पदाधिकारी क्लबचे अध्यक्ष पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर सदस्य अनिताताई पवार उमाताई दिगिनाळ अर्चनाताई बंडगर तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी जुळे सोलापूर प्रतिष्ठान शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था यांनी देखील आव्हानाला प्रतिसाद देत वृक्षारोपण केले, सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment