सारा न्यूज नेटवर्क -
'सज्जनांचा सखा, दुर्जनांचा कर्दनकाळ'..!
PSI अल्फाज शेख यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सन्मान..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्ठ मंडळाने एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सज्जनांचा सखा तर दुर्जजणांचा कर्दनकाळ म्हणून आगळी वेगळी ओळख असणारे तसेच समाजातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व सर्व सामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करणारे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक जबरी चोरी घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करत अनेक गुन्हेगारांना जेरबंद करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री अल्फाज शेख यांच्याशी पत्रकार सुरक्षा समितीने संवाद साधला यावेळी उपनिरीक्षक अल्फाज शेख म्हणाले की एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सामाजिक सलोखा राखत गुन्हेगारी रोखने त्याच बरोबर कायदा सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.राम हुंडारे संघटक अरुण सिडगिड्डी शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बिएस ) कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी दत्तात्रय बनसोडे रमेश अपराध इत्यादी पत्रकार उपस्थित होते.


No comments:
Post a Comment