सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : भावपूर्ण श्रद्धांजली.! मैंदर्गीरत्न आदरणीय ए. जी. पाटील दादा यांचे दुःखद निधन
A G पाटील इंजिनिअरिंग कॉलेज संस्थापक अध्यक्ष, जुळे सोलापूर जनक, मैंदर्गीरत्न अण्णाराव पाटील यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अल्प आजाराने सोमवार दिनांक 3 जुलै रोजी रात्री दहा वाजून 37 मिनिटांनी निधन झाले.
मंगळवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत संतोष नगर येथील राहत्या घरी अंत दर्शनासाठी राखीव ठेवून त्यानंतर अंत्यविधी त्यांच्या जन्मभूमी मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे दुपारी तीन वाजता होणार आहे.
माजी आमदार शिवशरण आण्णा बिराजदार-पाटील सारख्या गरीब कुटुंबातील तरूणाला सोलापूर येथे आणून त्यांच्या जीवनाचा कायापालट करणारे भाग्यविधाते,जुळे सोलापूर भागात सर्वसामान्यांना अतिशय अल्प दरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेणारे,संतोष नगर,शांती नगर,विजय नगर,शिवगंगा नगर,कर्णिक नगर अशी सोलापूरातील अनेक नगरे ज्यांनी वसवली,शांती इंग्लिश मीडियम स्कूल, ए जी पाटील इंजीनियरिंग कॉलेज यासारखे नामांकित शिक्षण संकुल ज्यांनी उभारले,मैंदर्गी येथील शिवचलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मैंदर्गीरत्न आदरणीय ए. जी. पाटील काका यांचे काल रात्री उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे ते ८७ वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्म्यास सद़्गती लाभो हीच प्रार्थना !
भावपूर्ण आदरांजली..!
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment