सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर ( प्रतिनिधी ) : पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले जात आहेत त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे काही विषय प्रलंबित असून
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत बाळकृष्ण सदाफुले यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा सचिव अन्सर तांबोळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर समन्वयक श्रीकांत कोळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे अबूबकर तांबोळी विजू दा नागमोडे विवेकानंद खेत्री सतीश गडकरी मोहम्मद तांबोळी श्रीकांत जाधव रवी मनहळी इत्यादी उपस्थित होते पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांचा ओळखपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे .
No comments:
Post a Comment