Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 15, 2024

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरिब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरिब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे उद्योगपती ईस्माईल (मुन्नाभाई) शेख व धनराज (नाना) जानकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच गोरगरिब व गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळेस प्रमुख उपस्थित क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श (भैय्या) धडे व माजी पी.एस.आय अनिल उकरंडे साहेब, राम विटकर, क्रांतीसुर्य प्रमुख मार्गदर्शक शशिकांत (मेजर) उकरंडे, लखन पवार, बत्तु विटकर, उत्सव अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, उत्सव उपाध्यक्ष बाळासाहेब लोंढे, सदस्य अंबादास भवाळे, महेश धडे, इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर दिडवाणी, इ. परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन अजय धडे यांनी केले.



सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment