Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 22, 2024

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड वतीने ईद मिलन;


 सारा न्यूज नेटवर्क - 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड वतीने ईद मिलन; 

 प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मानपत्र देऊन सन्मान.. 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड  वतीने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रगतशील उच्चशिक्षित प्रताप डेंगळे चांगदेव काशीद सुधीर कोकाटे पंकज मिसाळ वसंतराव वडगावे शकील बागवान यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला 

 भारत हा कृषिप्रधान देश आहे देशात शेतकरी हा निस्वार्थी प्रयत्न करणारा समूह आहे तो पिकविक असलेले धान्य फळ भाज्या कोणाच्या मुखात जाणार आहेत याची कल्पना नसतानाही तो निस्वार्थ तळमळीने कष्ट करून पिकवतो शेतकरी जगला तर देश जगणार आहे त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे असे मत नेताजी गोरे यांनी व्यक्त केले प्रगतशील शेतकरी बालाजी पंडित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास 

मौलाना ताहेरबेग, भंते सारीपूत, राजशेखर हिरेहब्बू, माजी आमदार दिलीप माने, नरसय्या आडम, नरसिंग मेंगजी  चंद्रकांत वानकर  माजी महापौर आरिफ शेख, एडव्होकेट यू एन एरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा अजय दासरी, अमोल शिंदे, विष्णू कारमपुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल , पद्माकर काळे, राजन जाधव, संतोष पवार, बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, श्रीदेवी फुलारी, केदार उंबरजे  रवींद्र मोकाशी  गंगाधर कारीमुंगी, केबी नदाफ, मुनाफ चौधरी, प्रा मेहबूब दलाल, अन्वर सैफन, हाजी मैनोद्दीन शेख,विष्णू गायकवाड, युवराज पवार, श्रीकांत घाडगे, माऊली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

 प्रस्ताविक संयोजक मतीन बागवान यांनी केले तर सूत्र संचालन राम गायकवाड यांनी केले. 

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे राजू हुंडेकरी जावेद बद्दी बशीर सय्यद रिजवान शेख अमजद पठाण हारून शेख तनवीर गुलजार कादरभागानगरी वाहिद तांबोळी वाहिद शेख तन्वीर शेख अ गनी करनुल मोहसीन नदाफ कय्युम मोहोळकर गफार खान पठाण रुस्तम शेख यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment