सारा न्यूज नेटवर्क -
कर्तव्यदक्ष नगरसेविका राजश्री चव्हाण व समाजसेवक अनिल चव्हाण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अभिवादन...
सोलापूर (प्रतिनिधी) :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 16 एप्रिल रोजी प्रभाग 26 मधील महाराजा सम्राट अशोका मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था जुळे सोलापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीनिमित्त प्रभाग 26 च्या कर्तव्यदक्ष, जनतेच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व समाजसेवक अनिल चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
विशेष म्हणजे पूजेसाठी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण ह्या येणार आहेत म्हणून माईक मधून अलाउसिंग होताच रुबी नगर मधील मुस्लिम समाजातील बांधव आवर्जून उपस्थित होते व त्यांनी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी त्यांच्या नगरात केलेली विकास कामे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
याप्रसंगी संस्थापक शिवा (अण्णा) वाघमारे,अध्यक्ष कृष्णा रिझोरा, उपाध्यक्ष बाळू राठोड,ओंकार राऊत,सचिव प्रमोद राठोड,प्रदीप पाटील,सहसचिव प्रकाश जाधव, शुभम फाळके,अतुल निंबाळकर, विजय चव्हाण,चैतन्य दळवी,प्रथमेश मनसुबे,राजीव मस्के,महेश सरवदे, समर्थ शिंदे,अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment