Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 8, 2024

"शिवसेना दिवा (पूर्व) उपविभाग" प्रमुख पदी सूर्यकांत आत्माराम कदम यांची निवड...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सूर्यकांत आत्माराम कदम यांची "शिवसेना दिवा(पूर्व) उपविभाग" प्रमुख पदी निवड...

दिवा(प्रतिनिधी) :-  मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभा खासदार मा.डाॅ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने सूर्यकांत आत्माराम कदम यांची "शिवसेना दिवा(पूर्व) उपविभाग" प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. 

यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.गोपाळ लांडगे यांच्या सहिने शिवसेना दिवा शहर प्रमुख मा.रमाकांत मढवी तसेच उपशहरप्रमुख मा.शैलेश पाटील यांच्या हस्ते श्री.सूर्यकांत आत्माराम कदम यांना "शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख"पदाचे नियुक्ती पत्रक देण्यात आले.

यासाठी शिवसेना दिवा पूर्व, विभाग प्रमुख मा.उमेश अशोक भगत यांचा सहयोग लाभला

या कार्यक्रमास ॲड.आदेश भगत उपशहर प्रमुख, मा. अमर पाटील दिवाशहर युवा प्रमुख, मा.भालचंद्र भगत विभाग प्रमुख, मा.निलेश पाटील विभाग प्रमुख,  मा.गुरूनाथ पाटील विभाग प्रमुख इत्यादि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment