Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 21, 2024

सोनामाता आदर्श(कन्या) विद्यालय सोलापूर येथे सोलापूर इ.५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी छंद वर्गाचे आयोजन..



 सारा न्यूज नेटवर्क - 

सोनामाता आदर्श(कन्या)विद्यालय सोलापूर येथे सोलापूर इ.५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी छंद वर्गाचे आयोजन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरातील रेल्वे लाईन लागत असलेल्या सोनामता आदर्श(कन्या)विद्यालयात विविध कौशल्य व मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देऊन वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


 त्यामध्ये सुंदर हस्ताक्षर,चित्रकला,रंगभरण,संगणक पेपर आर्ट असे विषय ठेवण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दि.२० एप्रिल,२०२४ रोजी विद्यालयामध्ये  गायक सिद्धार्थ भडकुंबे सर यांनी या छंद वर्गामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वरातून मंत्रमुग्ध केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल प्रशालेच्या वतीने सिध्दार्थ भडकुंबे यांचे बुके देऊनआभार व्यक्त करण्यात आले.

 यावेळी प्रशालेचे मुख्याध्याप अघोर सर,परिवेक्षक  पटेल सर,छंद वर्गाचे प्रमुख मोहन कांबळे सर,भोसले मॅडम, क्षीरसागर मॅडम,वाले मॅडम यांच्यासमवेत विद्यार्थी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

                              ____



No comments:

Post a Comment