Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 22, 2024

जागतिक वसुंधरा दिन वृक्षारोपण करुन साजरा ; माझे रोप,माझी जबाबदारी..



 सारा न्यूज नेटवर्क - 

जागतिक वसुंधरा दिन वृक्षारोपण  करुन साजरा ;

माझे रोप,माझी जबाबदारी..!

   वृक्षारोपणाला पावसाने लावली हजेरी... 

 सोलापूर (प्रतिनिधी) :- आज जागतिक वसुंधरा दिन या दिनाचे औचित्य साधून विजापूर रोड वरील अशोक नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहासमोर विविध प्रकारचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. 

या दिनाचे महत्त्व व आपल्या पर्यावरण संवर्धन जलसंवर्धन प्लास्टिक प्रदूषण स्वच्छता यासाठी उपाय योजना असे वेगवेगळे उपक्रम माझी वसुंधरा अभियान जिल्हा विधी प्राधिकरण सेवा व इको नेचर क्लब व सर्व पर्यावरण संस्था पर्यावरण प्रेमी सर्व वसुंधरा मित्र उपक्रम हाती घेत आहेत. 16 तारखेला जल संवर्धन संवाद यात्रा करण्यात आली त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा म्हणून सोलापूर महानगरपालिका वसुंधरा अभियाना माध्यमातून कापडी पिशव्यांचा वापर व्हावा म्हणून कापडी पिशव्या वाटप करण्यात आले. इको नेचर क्लबच्या माध्यमातून रोपे वाटपही करण्यात आले. 

 आज 22 एप्रिल समाज कल्याण विभाग अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह अशोक नगर परिसर समोरील महानगरपालिका हद्दीतील परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले. 

यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण सेवाचे सर्व पदाधिकारी, अधीक्षक श्री नदाफ सर, लोकाअभिरक्षक देवयानी कणगी,  सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधराचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर, इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर, वसतीगृहाचे अधीक्षक चंद्रकांत जाधव, अर्चनाताई जगताप,  ओमसिंग बायस, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, बीव्हीजी ग्रुपचे व्यवस्थापक अजय आसबे व त्यांची सर्व टीम, इको नेचर क्लब टीम व वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थिती 50 झाडांचा सुरुवातीस वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानाचे खूप मोठे योगदान आहे. 

तसेच वस्तीग्रहातील विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती अभ्यासाविषयी पुस्तके ही देण्यात आली. 



 वृक्षारोपणात निसर्गाने पावसाची उपस्थिती दर्शवली.जांभूळ, कवट ,वड,आवळा, पिंपळ, बेल अशा प्रकारचे सर्व देशी व औषधी वनस्पती लावण्यात आली. लवकरच या दोन एकर परिसरात हरित नंदनवन करण्याच्या एक प्रयत्न आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment