सारा न्यूज नेटवर्क -
सदर बाजार पोलिसांकडून एक तासात घरफोडीचा गुन्हा उघडकिस 6लाख 55 हजार चा मुद्देमाल जप्त..
सोलापूर (प्रतिनिधी ):- सदर बझार पोलीस ठाण्यात भादवि कलम 457,380,34 मधील हारून जलालसाब करकम वय वर्षे 74 व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक रा.7/24 विद्यानगर दक्षिण सदर बझार हे बाहेरगावी हे बाहेरगावी गेले असता दिनांक 22-04-2024 रोजी रात्री 10 वा. ते दिनांक 23-04-2024 रोजी पहाटे 3 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घर फोडून बेडरूम च्या कपाटातील सुमारे 2 लाख 75 हजार व एकूण 80.5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार फिर्यादिने सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला . हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी सदर बझार पोलिसांना दिले होते .हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस सागर सरतापे व इतर अंमलदार यांना बोलावून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आण्याबाबत सूचना दिल्या होत्या .सदरचे तपास पथक सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन यातील फिर्यादीकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस करून परत येत असताना पोलीस अंमलदार सागर सरतापे यांना ह रोहित लक्ष्मण बाबावाले याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची गोपनीय बातमी मिळाली, आरोपीचा शोध घेण्याकरिता हे पथक जात असताना त्यांना सिद्धार्थ चौकात अभिलेखवरील गुन्हेगार रोहित लक्ष्मण बाबावाले हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून रोहित लक्ष्मण बाबावाले याला अटक करण्यात आली.
गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता रोहित लक्ष्मण बाबावाले वय 25 वर्षे रा.काळभैरव मठाजवळ बापूजी नगर सोलापूर ,विशाल रमेश बाबावाले वय 27 वर्षे. काळभैरव मठाजवळ बापूजी नगर सोलापूर अशी नावे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली.पोलिसांनी आरोपीकडून 6 लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला .
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे ,पोलीस उपनिरिक्षक नितीन शिंदे, पो.ना सागर सरतापे, पोहेकॉ. औदुंबर आटोळे,पोहेकॉ.संतोष मोरे,पोहेकॉ. शहाजहान मुलाणी,पोहेकॉ.राजेश चव्हाण,पोना. लक्ष्मीकांत फुटाणे, पोकॉ. मल्लु बिराजदार, पोकॉ.सागर गुंड, पोकॉ.सोमनाथ सुरवसे,पोकॉ. अबरार दिंडोरे,पोकॉ .हणमंत पुजारी, मपोकॉ.शोभा कुंभार,वाहनचालक पोकॉ.नंदू व्हटकर ,लक्ष्मण राठोड,पोना. इरफान शेख, यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले….
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment