Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 12, 2024

नूतन कार्याध्यक्ष सर्फराज शेख यांचा सत्कार

 


सारा न्यूज नेटवर्क - 

नूतन कार्याध्यक्ष सर्फराज शेख यांचा सत्कार

सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षापासून  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र स्वतंत्र चौकशी  इत्यादी प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच अग्रेसर आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारकडे आंदोलन उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून  तसेच वेगवेगळ्या विषयावर पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे .

 पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी  साप्ताहिक कार्यसम्राट सोलापूर शहर प्रतिनिधी सर्फराज शेख यांचे नुकतीच निवड करण्यात आली होती  त्यांचा नियुक्तीपत्र ओळखपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सिद्राम कोळी नागेश मात्रे रतिकांत कमलापुरे जितेंद्र व्हर्जन अक्षय चंदनशिवे राकेश फुल मामडी इत्यादी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment