Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, April 4, 2024

सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरीसाठी तिकीट निरीक्षक सम्मानित..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरीसाठी तिकीट निरीक्षक सम्मानित..

सोलापूर(प्रतिनिधी) : - मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरजकुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागात मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरी केल्याने तिकीट निरीक्षकांना सम्मानित करण्यात आले. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटिल यांच्या हस्ते या तिकीट निरीक्षकांना बुधवारी सन्मानित करण्यात आलं.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक


एस. ए. उबाळे यांनी ०१ एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच ५६, ४४, ५५५ इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. एस. के. झा यांनी या आर्थिक वर्षभरात ५०, ०९, ०१० इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. ते दुसऱ्या तर जी. एस. राजापुरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ४८,५४,७९५ इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. 

एका महिन्यात सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक

एका महिन्यात सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत सर्वोच्चस्थानी एस. ए. उबाळे यांचा समावेश आहे. त्यांनी मे २०२३ मध्ये एकाच महिन्यात १०, १२, २२५ रुपये इतका दंड वसूल करून दिला. या यादीत दुसऱ्यास्थानी एस. के. झा राहिले. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये एकाच महिन्यात ७, ११, ३२० रुपये इतका दंड वसूल करून दिला.

एका दिवसात सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक   एका दिवसांत सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी फझील शेख यांचा समावेश आहे. त्यांनी २२ मार्च २०२३ मध्ये एकाच दिवसात १,०२,०४० रुपये इतका दंड वसूल करून दिला. या यादीत दुसऱ्यास्थानी एस. ए. उबाळे यांचा समावेश आहे. त्यांनी २० एप्रिल २०२३ मध्ये एकाच दिवसात १,०१,०३० रुपये इतका दंड वसूल करून दिला.

याव्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरीसाठी शैलेंद्र, एस. एम. धामने, व्ही. बी. कोटकर, एस. के. मीना, संजीव कुमार, आर. के. मीना, मोबीन शेख, व्ही. डी. साळवे, प्रांजल ताटे, प्रिती धावणे आदींचा सम्मान वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment