सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर विधानसभेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन..!
सोलापूर (प्रतिनिधी) :- आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज गंगा पेट्रोल पंपासमोर टाकळीकर मंगल कार्यालय येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर विधानसभेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर लोकसभेचे उमेदवार श्री. रामभाऊ सातपुते यांच्यासह केले. या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बैठका तसेच लोकसभेची रणनीती ठरवण्याचे काम केले जाणार आहे. प्रसंगी मा. मोदीजींच्या नेतृत्वात ४०० पार जाण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे मत उपस्थितांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी लोकसभा विस्तारक श्री. विक्रम देशमुख, शहराध्यक्ष श्री. नरेंद्र काळे, विधानसभा प्रमुख श्री. हणमंत कुलकर्णी, श्री. मनीष देशमुख, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. अप्पासाहेब पाटील, श्री. आनंद बिराजदार, श्री. अर्जुन जाधव, श्री. विशाल गायकवाड, श्री. मळसिद्ध मुगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment