Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 15, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन साजरी करण्यात आली..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन साजरी करण्यात आली.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती इको नेचर क्लब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन विचारांची जयंती साजरी करण्यात आली. 

 सोलापूर महानगर पालिका 24 नंबर शाळा सुंदरम नगर येथे मुलांना प्रेरणात्मक बोधात्मक पुस्तक देऊन विचारांची जयंती साजरी करण्यात आली. 

 वर्षभर सोरेगाव येथील आश्रम असेल जिल्हा व बालकल्याण समितीचे रिमांड होम शाळा असेल वेगवेगळ्या शाळेत पुस्तके देऊन तसेच  ग्रंथालय किट असेल त्यांना पुस्तक देऊन विचारांची जयंती साजरी करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन देण्याचा एक प्रयत्न. आजच्या या मोबाईलच्या दुनिया मध्ये पुस्तकाची आवड लागावी बुद्धिमत्तेला चालना मिळावी व परिपक्व विधायक विचारांची पुढची पिढी घडावी हा एक प्रयत्न आहे. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्रीकृष्ण परमेश्वर सुतार सर  इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर व सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थितीत मुलांना ग्रंथालयीन पुस्तक देऊन तसेच पुस्तक वाचन करून जयंती साजरी करण्यात आली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment