Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 26, 2024

आचारसंहितामुळे वाळू माफियांची चांदी; महसूल अधिकारी गुंतले निवडणूक प्रकियेत कारवाईच्या नावानं बोंब...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

आचारसंहितामुळे वाळू माफियांची चांदी;

 महसूल अधिकारी गुंतले निवडणूक प्रकियेत कारवाईच्या नावानं बोंब... 

सोलापूर(प्रतिनिधी) :- सध्या महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले असल्यामुळे नद्यांमधून जोरदार वाळू उपसा सुरू आहे. यामुळे आचारसंहिता वाळू माफियांच्या पथ्यावर पडली असून वाळू माफियांची चांदी दिसून येत आहे.

सध्या आचारसंहिता सुरू असल्याने तसेच मतदान प्रक्रिया विविध प्रकारची प्रशिक्षणे यामध्ये महसूल विभाग गुंतलेला असताना नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.


 नुकतेच मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे वाळू उपसा करण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. वाळूज (ता. मोहोळ) येथे भोगावती व नागझरी नदीतून बैलगाडीतून वाळू उपसा करून साखरेवाडी (ता. उत्तर सोलापूर) शिवारात वाळू साठा केला जात आहे. या ठिकाणाहून ट्रॅक्टरद्वारे या वाळूची विक्री करण्यात येत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरु असून बाबत तहसीलदार तालुका उत्तर सोलापूर यांचे दुर्लक्ष असल्याने वाळू माफिया बिनधास्त पणे वाळू उपसा करत असल्याची चर्चा सुरु असून मंडळअधिकारी व तलाठी यांच्या संमतीने सदरचा वाळू उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहेत.

     स्वस्त वाळू विक्री बंदच.. 

सर्वसामान्यांसाठी स्वस्तात वाळू देण्याचे धोरण तत्कालीन पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्यावर्षों मे महिन्यात लागू केले होते. याची अंमलबजावणी होण्यास पावसाळा आला. त्यानंतरही या धोरणाप्रमाणे सुरळीत वाळू विक्री झालीच नाही. यामुळे स्वस्तातील वाळू विक्री बंदच आहे. यामुळे गरजू बांधकाम इच्छुकांना वाळू माफियांकडून जादा पैसे देऊन वाळू खरेदी करावी लागत आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment